पुणे येथील कोथरूड भागामध्ये सर्वाधिक श्री गणेशमूर्तींचे दान !

हिंदूंनो, श्री गणेशमूर्तीचे दान न करता वहात्या पाण्यात विसर्जन करा ! अध्यात्मशास्त्रानुसार कृती केल्यासच त्याचा लाभ होतो, हे जाणा ! – संपादक 

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – शहरात दीड दिवसाच्या ४ सहस्र ३१० श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. यापैकी २ सहस्र १७८ मूर्तींचे दान करण्यात आले. यामध्ये कोथरूड येथे मूर्ती संकलन केंद्रावर सर्वाधिक ८६५ श्री गणेशमूर्तीं संकलित केल्याची नोंद घनकचरा विभागाने केली असल्याची माहिती, महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.