देहलीत ३६५ गावांना इस्लामी आक्रमकांची नावे !

देशाची राजधानी ज्या जिल्ह्यात आहे, तेथील गावांना इस्लामी आक्रमकांची नावे असणे, ही स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! इस्लामी आक्रमकांची नावे गावे, शहरे किंवा मार्गांने असणे, हे गुलामीचे प्रतीक आहे. ते हटवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते ! – संपादक

देहली – जिल्ह्यातील हुमायू, तैमूर, औरंगजेब किंवा महंमद घोरी अशा आक्रमकांच्या नावाने असलेल्या गावांची मूळ नावे वेगळीच असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात अनेक ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये पुरावे आढळून आले असून त्यामध्ये या गावांची मूळ नावे हिंदूंच्या देवतांच्या किंवा महापुरुषांच्या नावांवरून असल्याचे समोर आले आहे.

१. सध्या ‘महंमदपूर’ गावाचे नाव पालटण्याची चर्चा चालू आहे. या गावाचे प्राचीन नाव ‘माधवपूर’ होते. इतिहासकार मनीषकुमार गुप्ता यांनी सांगितले की, पृथ्वीराज चौहान याचा  पराभव केल्यानंतर महंमद घोरी याने उत्तर भारताची सत्ता त्याचा गुलाम कुतुबुद्दीन ऐबक याच्याकडे सोपवली आणि तो परत निघून गेला. त्यानंतर घोरीच्या इच्छेप्रमाणे कुतुबुद्दीन ऐबक याने भारतात इस्लामचा प्रचार करण्यासाठी येथील स्थानांची नावे पालटण्यास प्रारंभ केला. त्याप्रमाणे ‘माधवपूर’ गावाचे नाव पालटून मालकाच्या नावाने, म्हणजे महंमद घोरी याच्या नावाने ‘महंमदपूर’ असे केले होते, जे अजूनही प्रचलित आहे.

२. देहलीचे पुरातत्व विभागाचे माजी संचालक डॉ. धरमवीर शर्मा यांच्या मते, ‘देहलीतील अनुमाने ३६५ गावांची नावे परकीय आक्रमकांच्या नावावर आहेत.’ इस्लामी आक्रमकांनी ठेवलेले महरौलीचे नाव पूर्वी ‘मिहिरावाली’ होते. प्रसिद्ध खगोलतज्ञ आचार्य वराह मिहिर यांच्या नावावरून ते ठेवण्यात आले होते.

३. पौराणिक इतिहासकार नीरा मिश्र यांच्या मते, मोगलांच्या काळात देहलीमधील अनेक गावांची नावे पालटण्यात आली. हौज खास आणि सिरी फोर्ट या भागाचे नाव शाहपूर जट होते. मनीषकुमार गुप्ता यांच्या मते, मोगल काळात पटपडगंजचे नाव साहिबगंज ठेवण्यात आले. ते एका मोगल बादशाहाच्या प्रेमिकेच्या नावावर आधारित होते.

४. दक्षिण देहलीतील हुमायूपूर हे गाव ३५० वर्षांपूर्वीचे आहे. ते पूर्वी हनुमानपूर नावाचे ओळखले जात होते. आक्रमक त्यांच्या विजयाची खूण म्हणून गाव, विभाग आणि शहरे यांच्या नावामध्ये पालट करायचे, असेही इतिहासकारांचे म्हणणे आहे.