‘२०.१.२०२० या दिवशी माझे मन उदास झाले होते. महाविद्यालयात झालेले प्रसंग आठवून मला त्रास होत होता. अशा स्थितीत देवाने सुचवलेली कविता पुढे दिली आहे.
आहे तुझी खडतर वाट ।
पण नक्की येईल यशाची पहाट ।। १ ।।
तू चालत रहा योग्य दिशेने ।
तुला योग्य मार्ग मिळेल, या आशेने ।। २ ।।
येतील तुझ्या वाटेत खूप काटे ।
पण काढून टाकशील तू ते काटे ।। ३ ।।
चढायचा आहे तुला जीवनाचा घाट ।
नक्की येईल तुझ्या जीवनात आनंदाची लाट ।। ४ ।।
होईल तुझी स्वप्नपूर्ती ।
अन् होईल तुझी जगात कीर्ती ।। ५ ।।
करत रहा मनाचा अभ्यास ।
हाच आहे खरा जीवनाचा ध्यास ।। ६ ।।
नक्की येईल तुझ्या जीवनी यशाचा प्रकाश ।
तुला मार्ग मिळेल, होऊ नको निराश ।। ७ ।।
भगवंताप्रती असू दे सदैव भक्ती ।
परिस्थितीला सामोरे जाण्याची येईल तुझ्यात शक्ती’ ।। ८ ।।
– कु. साक्षी संतोष रुद्रकंठवार, मानवत, परभणी. (२०.१.२०२०)