पुणे, ३ सप्टेंबर – या वर्षी येथील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार आहे. ‘ट्रस्ट’च्या १२९ वर्षांत सलग दुसर्या वर्षी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे उत्सवाची परंपरा खंडित होत आहे. ऑनलाईन दर्शन सुविधा आणि ऑनलाईन कार्यक्रम यांवर भर देण्यात येणार असून ‘ऑगमेंटेड रिॲलिटी’ या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून भक्तांना घरबसल्या मंदिराच्या गाभार्यात बाप्पाची आरती करण्याचा अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून घेता येणार आहे, अशी माहिती ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट’चे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी २ सप्टेंबर या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.