‘पू. भाऊकाका (पू. अनंत आठवले) दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेखांचे हिंदीत भाषांतर करतात. एकदा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याविषयीची एक धारिका भाषांतरासाठी आली होती. त्या वेळी पू. भाऊकाका सद्गुरु पिंगळेकाकांची गुणवैशिष्ट्ये सांगू लागले. तेव्हा त्यांच्या तोंडवळ्यावर सद्गुरु पिंगळेकाकांविषयी कौतुकाचा भाव दिसत होता. पू. भाऊकाकांनी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याविषयी सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे लेख प्रसिद्ध होतात. त्या लेखांच्या माध्यमातून ते साधकांना जे मार्गदर्शन करतात, ते छान असते. मला त्यांचे लेख आवडतात.
२. एकदा मी सद्गुरु पिंगळे यांना एक प्रश्न विचारला होता. त्याचे त्यांनी अगदी पटकन अचूक उत्तर दिले.
३. त्यांच्याकडे बघून शांत आणि स्थिर वाटते.’
– सौ. समृद्धी राऊत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.८.२०२१)