कल्याण येथील १ लाख रुपयांच्या लाचेप्रकरणी तहसीलदार आणि शिपाई कह्यात !

तहसीलदार दीपक आकडे (डावीकडे ) व शिपाई मनोहर हरड

ठाणे, ३१ ऑगस्ट (वार्ता.) – कल्याण तालुक्यातील वरप येथील भूमींविषयीच्या हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी कल्याण येथील तहसीलदार दीपक आकडे यांनी १ लाख रुपयांची लाच मागितली, तसेच लाचेची रक्कम शिपाई मनोहर हरड यांच्याकडे देण्यास सांगितले. हरड यांनीही स्वत:साठी आणि कर्मचार्‍यांसाठी २० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही रक्कम घेतल्याचे ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यातून निष्पन्न झाल्याने तहसीलदार आकडे आणि शिपाई हरड यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी. – संपादक)