मकोकासारख्या गुन्ह्यात फरार असलेले रवींद्र बर्‍हाटे आणि त्यांना आश्रय देणारे अधिवक्ता पोलिसांच्या कह्यात !

अधिवक्त्यांनी गुन्हेगारांना पाठीशी घालणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्यासारखे झाले. अशा अधिवक्त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी. – संपादक

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पुणे – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत फरार असलेले माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटे यांना आश्रय देणार्‍या अधिवक्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले. या अधिवक्त्यांच्या घरातून पोलिसांना आव्हान देणारे व्हिडिओ बर्‍हाटे यांनी सामाजिक प्रसारमाध्यमांमधून प्रसारित केले होते. संजय म्हस्के असे कह्यात घेतलेल्या अधिवक्त्यांचे नाव असून रवींद्र बर्‍हाटे यांना खोलीवर रहाण्यास दिल्याप्रकरणी त्यांना कह्यात घेतले. गुन्हे शाखा १ चे साहाय्यक पोलीस आयुक्त सुरेंद्रकुमार देशमुख याविषयी अधिक अन्वेषण करत आहेत. तक्रारदाराचे रो हाऊस बळजोरीने बळकावण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देऊन बनावट दस्त बनवणे यासमवेतच खंडणी मागितल्याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात रवींद्र बर्‍हाटे यांच्यासह १३ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. बर्‍हाटे आणि त्यांना फरार रहाण्यास साहाय्य केल्याप्रकरणी त्यांचे अधिवक्ता सागर म्हस्के यांना पोलिसांनी कह्यात घेतले.