पुणे – शिवाजीनगर येथील नामांकित डब्ल्यू.एन्.एस्. या आस्थापनातील कर्मचारी आदित्य राजेश लोंढे यांनी आस्थापनाने दिलेल्या अधिकारांचा अपलाभ घेत ऑनलाईन माध्यमातून ३ कोटी ६८ लाख रुपयांची फसवणूक केली. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने त्याला कह्यात घेतले असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर लोंढे पसार झाले होते; मात्र जंगली महाराज रस्त्यावरील जे.एम्. कॉर्नर येथे ते आले असल्याची बातमी मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना कह्यात घेतले.