१७ शेतकर्यांवर गुन्हा नोंद
सोलापूर – महावितरण वीज आस्थापनाने थकीत वीजदेयकांच्या वसुलीसाठी शेतकर्यांची वीज खंडित करण्याची मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेच्या विरोधात माढा तालुक्यातील मोडनिंब येथे शेतकर्यांनी शेतमाल डोक्यावर घेऊन महावितरण शाखेच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. या वेळी शेतकर्यांनी वीज अभियंत्यापुढे पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी १७ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. या वेळी शेतकर्यांनी ‘शेतमाल महावितरणने वीजदेयक समजून स्वीकारावा आणि वीज खंडित करू नये’, अशी मागणी केली आहे.