उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. ओम संतोष देशमुखे एक आहे !
श्रावण कृष्ण पक्ष पंचमी (२७.८.२०२१) या दिवशी सांगोला (जिल्हा सोलापूर) येथील कु. ओम संतोष देशमुखे याचा नववा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. ओम संतोष देशमुखे याला नवव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. जन्मापूर्वी
१ अ. ‘मी गरोदर असतांना सत्संगाला जात असे. त्या कालावधीत मी घरी बसून पुष्कळ सेवा केल्या.
१ आ. पोटातील बाळाची हालचाल न जाणवणे आणि कापराने स्वतःची दृष्ट काढून नामजपादी उपाय केल्यावर बाळाची हालचाल जाणवू लागणे : सहाव्या मासात मला पोटातील बाळाची हालचाल जाणवत नव्हती. त्यामुळे आम्ही रुग्णालयात गेलो. दुपार झाली, तरी मला पोटातील बाळाची हालचाल जाणवली नाही. मी कापराने स्वतःची दृष्ट काढली आणि नामजपादी उपाय केले. त्यानंतर मला पोटातील बाळाची हालचाल जाणवू लागली.
२. जन्म ते १ वर्ष
२ अ. रुग्णालयातून घरी आल्यावर १५ दिवस बाळ पुष्कळ रडणे, मंदिरातील एका व्यक्तीने ‘बाळाला भवानीमातेचे नाव द्या’, असे सांगितल्यावर बाळाचे नाव ‘अंबादास’ असे ठेवायचे ठरवून देवीला प्रार्थना करणे आणि तेव्हापासून बाळ शांत होणे : आम्ही रुग्णालयातून घरी आल्यावर बाळ १५ दिवस रात्री पुष्कळ रडत होते. आम्हाला त्याचे कारण लक्षात येत नव्हते. बाळाला झोपेचे औषध दिले, तरी ते झोपत नव्हते. आम्ही एका मंदिरातील एका व्यक्तीला याविषयी विचारले. तेव्हा त्या व्यक्तीने सांगितले, ‘‘भवानीमातेने तुम्हाला हे बाळ प्रसाद म्हणून दिले आहे. तुम्ही बाळाला भवानीमातेचे नाव द्या.’’ तेव्हा मी बाळाचे नाव ‘अंबादास’ असे ठेवायचे ठरवले. ‘बाळाचा जन्म श्रावणी सोमवारी झाला असल्याने त्याचे नाव ‘ओम’ ठेवायचे’, असे घरातील व्यक्तींनी ठरवले. मी मंदिरातून घरी आल्यावर देवीला प्रार्थना केली, ‘आई, तुझे नाव बाळाला देते. तूच तुझ्या लेकराला शांत कर.’ तेव्हापासून बाळ एकदम शांत झाले. मी त्याला प्रतिदिन एकदा तरी ‘अंबादास’ म्हणते.
२ आ. घरात साप दिसून ‘तो बाळाच्या रक्षणासाठी आला आहे’, असे जाणवणे : एकदा मी मंदिरात जाऊन घरी आल्यावर काही वेळाने प्रसाधनगृहात गेल्यावर मला तेथे खवले असलेला हिरव्या रंगाचा साप दिसला. मी घरातील व्यक्तींना सांगेपर्यंत तो तेथून निघून गेला. नंतर मला तोच साप ३ वेळा घरात दिसला. तो ‘बाळाच्या रक्षणासाठी आला आहे’, असे माझ्या लक्षात आले. मी माहेरी गेल्यावरही मला २ वेळा साप दिसला.
२ इ. ओम वर्षभर पुष्कळ शांत होता. तेव्हा ‘घरात बाळ आहे’, असे कुणालाच वाटत नव्हते. तो सतत कृष्णाच्या चित्राकडे बघून खेळायचा.
३. वय १ ते २ वर्षे
३ अ. सत्संगाला गेल्यावर ओमने त्रास न देणे : ओम २ वर्षांचा झाल्यावर मी पुन्हा सत्संगाला जायला प्रारंभ केला. तो तिथे गेल्यावर थोडा वेळ खेळून नंतर झोपायचा. त्याने मला सत्संगात कधीही त्रास दिला नाही.
३ आ. हरवलेला ओम पोलीस ठाण्यात सापडणे, एका बाईने त्याला तेथे आणून सोडल्याचे समजणे आणि ‘भवानीमाता अन् गुरुमाऊली त्याचे रक्षण करत आहेत’, असे वाटणे: एकदा आम्ही अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथे गेलो असतांना ओम हरवला होता. आम्हाला तो एक घंट्याने पोलीस ठाण्यात सापडला. तेव्हा पोलिसांनी ‘एक बाई त्याला घेऊन आली होती’, असे सांगितले. त्या वेळी ‘भवानीमाताच त्याचे रक्षण करत आहे. गुरुमाऊलीनेच त्याला तेथे पोचवले’, असे मला वाटले.
३ इ. तो २ वर्षांचा असल्यापासून सोलापूर येथील रस्ते त्याच्या लक्षात आहेत.
४. वय ३ ते ८ वर्ष
४ अ. तो वयाच्या ५ व्या वर्षापर्यंत रुग्णाईत असायचा. त्याच्यासाठी नामजपादी उपाय केल्यावर त्याला बरे वाटायचे.
४ आ. कुशाग्र बुद्धीमत्ता: शासनाच्या वतीने काही शाळांतून प्रत्येकी १० गरजू विद्यार्थ्यांची निवड करतात. त्यात ओमला निवडण्यात आल्याने त्याचे दहाव्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण विनामूल्य चालू झाले. त्याला गणिताचा शिकवणीवर्ग लावला होता. त्याला त्यातील पहिल्या परीक्षेत सुवर्णपदक मिळाले. त्याला दुसर्या परीक्षेत चषक (‘ट्रॉफी’) मिळाला. त्या परीक्षेच्या वेळी आम्ही पहाटे उठून नामजप आणि प्रार्थना केली होती.
४ इ. उत्तम निरीक्षणक्षमता आणि सतर्कता : मी त्याला घेऊन सत्संगाला गेल्यावर तो सत्संगात बसत नसे; मात्र त्या वेळी तो खेळत असतांनाही त्याचे सत्संगात सांगत असलेल्या सूत्रांकडे लक्ष असायचे. आम्ही घरी आल्यावर तो मला सांगायचा, ‘‘आई, आपण उद्या सेवा करायची ना ? ‘सेवेला कुठे जायचे ?’, हे मला ठाऊक आहे.’’ आम्हाला घरून विरोध असल्यामुळे आम्ही काहीतरी कारण सांगून सेवेला जायचो. आम्ही घरी आल्यावर तो घरातील व्यक्तींना सेवेविषयी काही सांगत नव्हता. मी गुरुमाऊलींच्या कृपेने सेवेला जाऊ शकत होते.
४ ई. देवाची ओढ : त्याला देवपूजा करायला पुष्कळ आवडते. मला अडचण असली की, तो देवपूजा करतो. तो आम्ही सांगितल्याप्रमाणे देवतांच्या मूर्तींची मांडणी करतो. तो मूर्तींना गंध लावतो आणि फुले अर्पण करतो. तो श्रीकृष्ण आणि निद्रादेवी यांना प्रार्थना करून झोपतो.
४ उ. तो लहान असल्यापासून माझ्या समवेत सेवेला येतो. आम्हाला सत्संगाला पोचवण्यासाठी कुणी नसल्यास तो दोन कि.मी. पायी चालायचा.
४ ऊ. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तो वर्गमित्रांना सनातनचे ग्रंथ आणि वह्या देण्यासाठी पुष्कळ उत्सुक असतो.
४ ए. नामजपादी उपाय करणे : तो प्रतिदिन ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप १०८ वेळा करतो. तो २ वेळा मोरपिसाने स्वतःवरील अनिष्ट शक्तींचे आवरण काढतो.
४ ऐ. जिज्ञासू वृत्ती : त्याला आपत्काळाविषयी माहिती सांगितल्यावर त्याने मला विचारले, ‘‘मी कोणता नामजप अधिक करू ? आपण औषधी वनस्पती लावूया का ? बिंदूदाबन शिकून घेऊया का ? तू प्रथमोपचार पेटी सिद्ध केलीस ना ? परात्पर गुरु डॉक्टरांनी जे सांगितले, ते सगळे आणून ठेवूया.’’
४ ओ. त्याने नामजपात वाढ केली आहे. तो कृष्णाला प्रार्थना करतो, ‘तूच घरातील सगळ्यांना साधना करायला सांग.’
५. स्वभावदोष
अव्यवस्थितपणा आणि भावनाशीलता’
– सौ. सविता देशमुखे (आई), सांगोला, जिल्हा सोलापूर. (२९.४.२०२१)
यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यू ट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |