कु. दीपाली मतकर (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), सोलापूर
१. वाचकांशी जवळीक साधणे
‘श्री. शेषेराव सुस्करकाका दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे नूतनीकरण तळमळीने करतात. काका गेल्या १० वर्षांपासून साप्ताहिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा आणि साप्ताहिकाच्या ४० अंकांचे वितरण करणे’, या सेवा करत आहेत. काकांनी वाचकांशी चांगली जवळीक साधली आहे. काकांनी त्यांना संस्थेशी चांगले जोडून ठेवले आहे.
२. ते प्रतिदिन सकाळी उठल्यावर सूक्ष्मातून परात्पर गुरुदेव, सद्गुरु, संत आणि साधक यांना भेटून नमस्कार करतात अन् नंतरच पुढील सेवेला आरंभ करतात.
३. काकांमध्ये जाणवलेले पालट
अ. काकांमधील ‘नम्रता आणि समोरच्या व्यक्तीला समजून घेणे’, या गुणांत वाढ झाली आहे.
आ. पूर्वी काकांचा स्वीकारण्याचा भाग अल्प होता. ‘माझे प्रयत्न चालूच आहेत’, असे काका सांगायचे; परंतु आता त्यांनी सर्वांकडून शिकून स्वतःकडे न्यूनता घेण्याचा भाग वाढवला आहे.
इ. ते साधकांशी प्रेमाने बोलतात.
ई. ते नेहमी शांत आणि स्थिर असतात.
सौ. अनुराधा देशमुख, बीड
‘काकांना गुडघेदुखीचा पुष्कळ त्रास आहे, तरी ते त्याचा विचार न करता साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करतात.
सौ. आशा निकम, बीड
१. ‘काका कामात व्यस्त असले, तरी ते त्यांचा व्यष्टी साधनेचा आढावा नियमितपणे पाठवतात.
२. सेवेची तळमळ
काका दिलेल्या वेळेत सेवेसाठी येतात. ते अडचणींवर मात करून सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. ते इतरांनाही सेवेसाठी येण्यास उद्युक्त करतात.
३. अनुभूती
त्यांचा आढावा वाचतांना माझी पुष्कळ भावजागृती होते आणि त्यातून मला प्रेरणा मिळते.’ (१५.७.२०२१)
सौ. संगीता नाटकर, बीड
१. ‘काका सहसाधकांना साहाय्य करतात.
२. ते प्रत्येक सेवेसाठी तत्पर असतात.
३. अनुभूती
ते साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ देण्यासाठी घरी आल्यावर त्यांच्याकडून आम्हाला पुष्कळ चैतन्य मिळते.’ (१५.७.२०२१)
|