उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. प्रीती गोरख खेतमाळस एक आहे !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
श्रावण पौर्णिमा (२२.८.२०२१) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. प्रीती गोरख खेतमाळस (वय १२ वर्षे) हिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सौ. मंगल गोरख खेतमाळस (आई), मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा नगर.
१. ‘कु. प्रीती लहानपणापासून पुष्कळ शांत आहे.
२. सुटीत रामनाथी आश्रमात रहायला आल्यावर साधनेची गोडी लागणे
आम्ही सगळे जण माझ्या भावाच्या (श्री. वाल्मीक भुकन यांच्या) लग्नासाठी २०.४.२०१७ या दिवशी पहिल्यांदा रामनाथी आश्रमात गेलो होतो. त्या वेळी प्रीती हिला तेथे रहायला पुष्कळ आवडले होते. त्यानंतर प्रत्येक सुटीत आम्ही रामनाथी आश्रमात रहायला जायचो. त्यामुळे तिला साधनेची गोडी लागली.
३. समंजस
ती गेल्या ६ मासांपासून रामनाथी आश्रमात राहून साधना करत आहे. तिला आश्रमात पाठवायला तिच्या आजीचा (वडिलांच्या आईचा) पुष्कळ विरोध होता. तेव्हा तिने तिच्या आजीला समजावून सांगितले, ‘‘अगं आजी, मी थोडे दिवस आश्रमात जाणार आहे. इकडे माझी शाळासुद्धा चालू नाही ना ? मी शाळा चालू झाल्यावर परत येते.’’
४. रामनाथी आश्रमात रहायला आल्यापासून झालेले पालट
अ. घरी असतांना तिचे तिच्या बाबांशी पटत नव्हते; पण आता ती भ्रमणभाषवर बाबांशी छान बोलते.
आ. आरंभी ती अनेक गोष्टी मनाप्रमाणे करायची; पण आता ती सगळे विचारून करते.
इ. आधी मला वाटायचे, ‘ती मला सोडून आश्रमात रहाणार नाही’; पण तो माझा अपसमज होता. मुलांना आई-बाबांचा लळा असतोच; पण देवाने पुष्कळ लवकर तिच्या मनाची आश्रमात रहाण्याची सिद्धता करवून घेतली.’ (२०.७.२०२१)
श्रीमती इंदुबाई भुकन (आजी (आईची आई), आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
स्वतःला पालटण्यासाठी प्रयत्न करणे
‘पूर्वी ती सर्वकाही मनाप्रमाणे करायची. आता रामनाथी आश्रमात आल्यापासून ती देवाला प्रार्थना करून स्वतःत पालट करण्याचा प्रयत्न करत आहे.’ (३१.७.२०२१)
सौ. उर्मिला भुकन (मामी), सनातन आश्रम, गोवा.
१. व्यवस्थितपणा
‘प्रीतीच्या कपाटातील खण नेहमी व्यवस्थित असतो. अंथरूण घालतांना ती अंथरुणावर एकही सुरकुती पडू देत नाही.
२. ती नेहमी आवश्यक तेवढेच बोलते.
३. व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमितपणे करणे
आश्रमात येण्यापूर्वी प्रीतीला स्वतःकडून झालेल्या चुकांचे लिखाण करायला जमत नव्हते. तिने ते चिकाटीने शिकून घेतले. ती नियमितपणे चुकांचे लिखाण आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनासाठीची स्वयंसूचना सत्रे करते. ती नियमितपणे ४ घंटे नामजप करते.
४. चुकांविषयीची संवेदनशीलता
ती तिच्याकडून झालेल्या चुका प्रामाणिकपणे सांगते आणि त्याविषयी तत्परतेने संबंधितांची क्षमाही मागते. इतरांनी लक्षात आणून दिलेल्या तिच्या चुका ती तत्परतेने स्वीकारते आणि ‘योग्य कृती कशी असायला हवी ?’, हे विचारून त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करते.’ (२०.७.२०२१)
कु. प्रीतीमधील स्वभावदोष
‘आळस, आवड-नावड असणे, मनमोकळेपणाचा अभाव आणि प्रतिमा जपणे’ – सौ. मंगल गोरख खेतमाळस आणि सौ. उर्मिला भुकन (२०.७.२०२१)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |