‘यू.ए.एस्.’ या यंत्राद्वारे केवळ व्यक्तीतील नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा मोजता येणे; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शोधलेल्या उपायपद्धतीत ऊर्जा मोजण्यासमवेतच नकारात्मक ऊर्जा नष्ट करता येणे

परात्पर गुरु डॉ. आठवले
कु. प्रियांका लोटलीकर

‘वर्ष २००३ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘साधकांना त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तींमुळे त्यांच्याभोवती त्रासदायक शक्तीचे आवरण किती आहे ?’, हे मोजून ती शक्ती नष्ट करण्याची उपायपद्धत शोधून साधकांसाठी नामजपादी उपाय करण्यास आरंभ केला. त्यांची आवरण मोजण्याची प्रक्रिया ‘यू.ए.एस्.’ (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर) या यंत्राप्रमाणे होती. ‘यू.ए.एस्.’ हे यंत्र हैद्राबाद येथील वैज्ञानिक डॉ. मन्नममूर्ती यांनी वर्ष २००३ मध्ये विकसित केले. या यंत्राद्वारे व्यक्तीमध्ये असलेली नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा मोजता येते. या यंत्राद्वारे ऊर्जा मोजतांना व्यक्तीच्या जवळ उभे राहून मागे मागे जात ‘ऊर्जेची कक्षा किती अंतरापर्यंत आहे ?’, हे मोजता येते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हातांच्या द्वारे शोधलेली साधकांभोवतीचे त्रासदायक आवरण किंवा साधकांमधील सकारात्मक अन् नकारात्मक ऊर्जा मोजण्याची पद्धत यंत्रापेक्षा अधिक प्रभावशाली होती. ‘आवरण किती अंतरापर्यंत आहे ?’, हे मोजण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले त्रास असणार्‍या साधकाच्या जवळून मागे चालत जात आणि ‘त्रासदायक आवरण किती फूट आहे ?’, हे शोधत असत. ‘आवरण किती अंतरापासून आहे’, हे लक्षात आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले ते आवरण दूर करत, म्हणजे साधकांसाठी नामजपादी उपाय करत असत. याद्वारे त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट करून साधकाला त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तीला दूर करता येते. ‘यू.ए.एस्.’ हे यंत्र ऊर्जेची कक्षा मोजू शकते; मात्र त्याला उपाय करता येत नाहीत. यावरून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शोधलेली उपायपद्धत किती प्रभावशाली आहे ?’, हे लक्षात येते.’

– कु. प्रियांका लोटलीकर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), संशोधन विभाग समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, रामनाथी, गोवा. (२३.४.२०२१)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.