काबुलमध्ये युक्रेनच्या विमानाचे अपहरण

प्रातिनिधिक छायाचित्र

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमध्ये युक्रेनच्या विमानाचे अपहरण करून ते इराणमध्ये नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. युक्रेनचे हे विमान त्याच्या नागरिकांना आणण्यासाठी अफगाणिस्तानात गेले होते. त्याच वेळी विमानाचे अपहरण करण्यात आले, असा दावा युक्रेनच्या उप परराष्ट्रमंत्र्यांनी केला आहे; मात्र या विमानाचे अपहरण कुणी केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काबुल विमानतळावर नागरिकांना युक्रेनला घेऊन जाण्यासाठी हे विमान उतरले होते. या विमानाने तेथून इराणच्या दिशेने  उड्डाण केले होते. दुसरीकडे इराणने युक्रेनचा दावा फेटाळला आहे. ‘युक्रेनचे विमान २३ ऑगस्टला मशहदमध्ये इंधन भरण्यासाठी थांबले होते. त्यानंतर युक्रेनला परतले’, असे स्पष्टीकरण इराणकडून देण्यात आले आहे.