दर्यापूर (जिल्हा अमरावती) येथील हवाई सुंदरी श्वेता शंके यांनी बजावली महत्त्वपूर्ण भूमिका !
अमरावती – एअर इंडियाच्या विशेष विमानाद्वारे अफगाणिस्तानात असणार्या १२९ भारतियांना १८ ऑगस्ट या दिवशी सुखरूप आणण्यात आले. काबुल येथील बिकट परिस्थितीचा सामना करत या विमानाचे भारतात आगमन झाले. विमानातील कर्मचार्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आपापली भूमिका समर्थपणे बजावल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. यांच्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील श्वेता शंके यासुद्धा सहभागी झाल्या होत्या. त्या हवाईसुंदरी असून त्यांनी भारतियांना परत आणण्याच्या मोहिमेत समन्वय करण्याची भूमिका बजावली. अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी श्वेता शंके यांच्याशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले आहे.
अमरावतीची ‘निरजा’, तालिबान्यांना घाबरली नाही, 129 प्रवाश्यांना मायदेशी आणलं, यशोमती ठाकूरांचा सॅल्यूटhttps://t.co/85z4PNgZDV#Afganistan #Afganisthan #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 18, 2021