कुडाळ – ‘बार काऊन्सील ऑफ महाराष्ट्र अँड गोवा’च्या अध्यक्षपदी ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ विधीज्ञ अधिवक्ता गजानन चव्हाण यांची, तर उपाध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ विधीज्ञ आणि बार काऊन्सीलचे सदस्य अधिवक्ता संग्राम दत्तात्रय देसाई यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांतील दीड लाखांहून अधिक अधिवक्त्यांचे प्रतिनिधित्व करणार्या बार काऊन्सीलच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदांवर प्रथमच कोकणातील अधिवक्त्यांची निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
मुंबई उच्च न्यायालयातील ‘बार काऊन्सील ऑफ महाराष्ट्र अँड गोवा’च्या मुख्य कार्यालयात १४ ऑगस्ट या दिवशी झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.