सात्त्विक उदबत्तीच्या विभूतीने दात घासल्यावर दातदुखी बंद होणे

सौ. अनुपमा जोशी

‘माझे ३ – ४ दात दुखत होते. मी नेहमीप्रमाणे दातांत लवंग आणि कापूर ठेवला; पण दुखणे थांबले नाही. तेव्हा मी दंतमंजन लावले, तरी दुखणे थांबले नाही. दात दुखत असल्यामुळे माझे डोके, डोळे अन् कान दुखायला लागले. मला रात्री झोप येत नव्हती. ‘काय करावे ?’, हे मला सुचत नव्हते. त्या वेळी सूक्ष्मातून श्रीकृष्णाने मला ‘पूर्वी तू काय करत होतीस ?’, ते आठव’, असे सांगितले. मी लगेच उठले आणि सात्त्विक उदबत्तीची विभूती घेतली अन् ती दातांना चोळून लावली (तिने दात घासले). मला एका घंट्याने ५० टक्के बरे वाटले. मी संध्याकाळी पुन्हा दातांना विभूती लावली आणि काय आश्चर्य ! माझे दात दुखणे बंद झाले.

मी घरी असतांना मला काही लागले, जखम झाली किंवा खरचटले, तर प्रथम विभूतीच लावत होते आणि मला त्याने बरे वाटायचे. हे मी आता विसरले. ‘हे श्रीकृष्णा, मी तुला विसरले. मला क्षमा कर. तू जवळ असतांना मी दोन दिवस दुखणे सोसले आणि ‘एवढ्या दुखण्यातही तू सेवा व्यवस्थित करून घेतलीस’, त्याविषयी कृतज्ञता !

‘देवा, मी खरंच वेडी आहे रे ! मला काहीच कळत नाही. तू जवळ असतांनासुद्धा मी इतरत्र पहात असते. खरंच मला क्षमा कर आणि असाच माझ्याजवळ रहा अन् या अज्ञानी म्हातारीला सांभाळ.’

– सौ. अनुपमा जोशी (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.७.२०२०)