श्री. हनुमंत साहेबराव जाधव, गोरक्षक, समस्त हिंदू आघाडी, पुणे, महाराष्ट्र
१. ‘आश्रम पाहून मला जाणवले, ‘मी ब्रह्मांडगोलामध्ये भ्रमण करत आहे. संपूर्ण देवतांचा वास या ठिकाणी जागोजागी जाणवत आहे.’
२. विशेषतः ‘आपली चूक मान्य करून ती इतरांना दाखवणे’, ही मोठी गोष्ट प्रथमच आश्रमात निदर्शनास आली.
३. सर्व आश्रम फिरत असतांना जे साधक भेटले, ते अनोळखी असतांनासुद्धा स्मितहास्य करत होते. त्यांना पाहून ‘जणू आपले पूर्वजन्माचे नातेच आहे कि काय ?’, असे वाटले.
४. ‘स्वच्छता, साधकांचे शुद्ध मन आणि एकमेकांना दिलेली आदरभावना’ ही या आश्रमाची वैशिष्ट्ये आहेत.
५. येथील कणाकणांमध्ये परमेश्वराचे अस्तित्व आहे.’
श्री. सतीश विश्वास बागुल, नंदुरबार
१. ‘समाजातील वातावरणापेक्षा आश्रमातील वातावरणात वेगळेपणा जाणवतो. आश्रमात ईश्वरी तत्त्वानुसार प्रत्येक गोष्ट घडते. प्रत्येकाला ईश्वराकडे जाण्याची ओढ दिसते; म्हणून वातावरणात केवळ आनंद जाणवतो.
२. आश्रमात ईश्वरी अस्तित्व जाणवते. पुष्कळ चैतन्य जाणवते. एवढे मोठे नियोजन करणे आणि व्यवस्थापन करणे, हे केवळ ईश्वरच करू शकतो.’
श्री. हर्षल कि. देसाई, धुळे, महाराष्ट्र.
‘आश्रम म्हणजे चैतन्याचा आणि सात्त्विकतेचा समुद्र आहे. याविषयी जेवढे जाणून घ्यावे तेवढे थोडे आहे. आश्रमात आल्यानंतर सात्त्विकतेची आणि साधनेची शक्ती लक्षात येते.’
सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
‘जर बुद्धीवाद्यांनी सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन बघितले, तर अध्यात्माविषयी त्यांच्यात जिज्ञासा निर्माण होऊ शकते आणि जे साधक आहेत, त्यांची श्रद्धा आणि साधनेतील तत्परता वाढू शकते.’ – श्री. मानव बुद्धदेव, सचिव, तसेच मिडिया प्रभारी, योग वेदांत सेवा समिती, अमरावती तथा सचिव, पर्यावरण समिती, लोहाणा महापरिषद, विदर्भ, महाराष्ट्र. (४.६.२०१९)
सूक्ष्म जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात. |