भारतात ९५ टक्के विवाहांमध्ये हुंडा दिला जातो ! – जागतिक बँकेचा अहवाल

गेली अनेक दशके भारतात हुंड्याच्या विरोधात जनजागृती होत असतांनाही ही स्थिती असणे भारतियांना लज्जास्पद !

नवी देहली – जागतिक बँकेच्या अभ्यासाच्या अहवालामध्ये भारतात अद्यापही हुंड्याची पद्धत कायम असल्याचे म्हटले आहे. वर्ष १९६० ते २००८ या कालावधीत ग्रामीण भारतामधील १७ राज्यांतील ४० सहस्र विवाहांचा अभ्यास करण्यात आला. त्यांतील ९५ टक्के विवाहांमध्ये हुंडा दिला आणि घेतला गेला. वर्ष १९७५ च्या पूर्वी आणि वर्ष २००० नंतर वर पक्षाकडून वधू पक्षासाठी भेटवस्तूंसाठी सरासरी ५ सहस्र रुपये खर्च केले, तर वधू पक्षाने वर पक्षासाठी सरासरी ३ लाख ५० सहस्र रुपये खर्च केले.