भूस्खलनावर उपाययोजना काढण्यासाठी एजन्सी नेमणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, १० ऑगस्ट (वार्ता.) – गेल्या महिन्यात पावसामुळे सत्तरी तालुक्यातील साट्रे येथे, तसेच राज्यात इतर २-३ ठिकाणी भूस्खलन होण्याच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर भविष्यात भूस्खलन होऊ नये; म्हणून भूस्खलनावर उपाययोजना काढण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्याचा विचार गोवा शासन करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘भूस्खलन झालेल्या स्थळांना वन आणि जलस्रोत या खात्यांतील अधिकार्‍यांचे पथक अन् जिल्हाधिकारी यांनी भेट दिली आहे. या समस्येचे मूळ कारण काय ? याविषयीचा अहवाल सिद्ध केला जात असून त्यानुसार सावधगिरी बाळगण्याविषयी उपाययोजना सिद्ध केली जाईल.’’