प्रांजळपणा, परिपूर्ण सेवा करण्याचा ध्यास आणि भोळा भाव असलेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या राजगुरुनगर (पुणे) येथील सौ. योगिता औटी (वय ३५) !
१. नम्रता
‘योगिताताई साधकांशी नम्रतेने बोलते.
२. प्रांजळपणा
ताई सत्संगात ‘तिच्या साधनेची स्थिती, ती साधनेत कुठे न्यून पडते’, यांविषयी प्रांजळपणे बोलते. तिचे जे चुकते, ते ती स्पष्टपणे सांगते. त्या वेळी तिच्या बोलण्यात खंत जाणवते.
३. साधे रहाणीमान
तिचे रहाणे, वागणे आणि बोलणे यांत पुष्कळ साधेपणा असतो.
४. भोळा भाव
ताईच्या बोलण्यात कुणाविषयी तक्रारीचा सूर नसतो. तिच्यात भोळा भाव आहे.’
– कु. वैभवी भोवर, पुणे
५. तळमळीने सेवा करणे
५ अ. परिपूर्ण सेवा करणे : ‘ताईकडे काही सेवांचे दायित्व आहे. ताई परिपूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न करते. तिच्याकडे असलेल्या सेवांचा कधीच पाठपुरावा घ्यावा लागत नाही. ती मिळालेली सेवा मनापासून करते.
५ आ. दायित्व घेऊन सेवा करणे : ताई दायित्व घेऊन प्रसार करते. पूर्वी ती स्वतःची सेवा आणि व्यष्टी साधना एवढाच विचार करायची. नंतर तिला याविषयी जाणीव करून दिल्यावर तिने तत्परतेने स्वतःत पालट केला. गेल्या सहा मासांत ती पुढाकार घेऊन सेवा करते.
५ इ. झोकून देऊन सेवा करणे : तिची शारीरिक प्रकृती नाजूक आहे, तरी ती स्वतःला कधीच सांभाळत नाही. ती स्वतःला झोकून देऊन सेवा करते.
६. स्थिर
ताईच्या वडिलांचे ३ मासांपूर्वी निधन झाले. त्या वेळी ताईला थोडा ताण आला होता; पण नंतर तिने योग्य दृष्टीकोन घेऊन केवळ ३ दिवसांत या सर्वांतून स्वतःला सावरले. त्यानंतर तिने साधनेचे प्रयत्न चालू केले.
७. क्षात्रभाव
ताईला आध्यात्मिक त्रास होत असतांना ती त्यावर तळमळीने मात करते आणि सेवा अन् व्यष्टी साधना करण्याचा प्रयत्न करते.
८. स्वतःला पालटण्याची तळमळ
ताई स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया मनापासून राबवते.
९. भाव
ती सेवा भावाच्या स्तरावर करते. ती सत्संगात प्रार्थना आणि कृतज्ञता सांगतांना तिच्यात पुष्कळ भाव जाणवतो.’
– सौ. कविता तापकीर, आळंदी, पुणे.
१०. ‘ताईमधील ‘साधकांना साहाय्य करणे, सेवेची तळमळ आणि गुरुदेवांप्रती असलेला भाव’ या गुणांमुळे ‘तिची प्रगती झाली’, असे वाटते.
गुरुदेवांच्या कृपेने मला ताईतील गुण शिकण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. वैभवी भोवर, पुणे (२०.६.२०२०)
|