मुसलमान तरुणांनी मुसलमान समाजामध्येच विवाह करावा ! – ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

मुसलमान तरुण आणि तरुणींनी मुसलमानेतरांशी विवाह करणे इस्लामला अमान्य !

  • गेली अनेक वर्षे देशात लव्ह जिहादचे प्रकार चालू असतांना ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’ ने हे का सांगितले नाही ? केवळ अशा प्रकारे सांगून धर्मांध थांबतील, याची शक्यता नसल्याने बोर्डाने यासाठी त्यांच्या धर्मामध्ये चळवळ उभारली पाहिजे ! – संपादक
  • बोर्डाने आता अशा प्रकारच्या विवाहावर बंदीच घालण्याचा आदेश दिला पाहिजे ! – संपादक
  • मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह केल्यावर त्याला ‘प्रेम’ म्हणणारे बोर्डाच्या या आवाहनावर काही बोलतील का? – संपादक
प्रातिनिधिक छायाचित्र

नवी देहली – ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने मुसलमान तरुणांना मुसलमान समाजामध्येच विवाह करण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात बोर्डाचे सरचिटणीस मौलाना (इस्लामी अभ्यासक ) खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून मुसलमान तरुण, त्यांचे शिक्षण, पालक यांना हे आवाहन केले आहे. देशातील लव्ह जिहादच्या घटनांवरून बोर्डाने हे आवाहन केल्याचे सांगितले जात आहे.

बोर्डाने या पत्रकात म्हटले आहे की, मुसलमान तरुण आणि तरुणी यांनी मुसलमानेतरांशी विवाह करणे चुकीचे आहे. शरीयतनुसार अशा विवाहांना इस्लाम मान्यता देत नाही. जर एखादा मुसलमान मुसलमानेतराशी विवाह करून संसार करतो, तर तो जन्मभर चुकीचेच करत रहातो. सध्याचे पालक त्यांच्या मुलांना इस्लामचे योग्य शिक्षण देत नाही. यामुळे मुसलमान धर्मगुरु, शिक्षक आणि पालक यांना आवाहन करतो की, तुमच्या मुलांना आपल्या धर्मामध्येच लग्न करण्यास सांगावे.