सातारा, ५ ऑगस्ट (वार्ता.) – गत दीड वर्षांपासून सातारा येथे १९ कर्मचार्यांच्या पथकाने आतापर्यंत ४ सहस्रांहून अधिक कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार केले आहेत. अंत्यसंस्कार करणार्या सातारा नगरपालिकेतील १९ आरोग्य कर्मचार्यांना पालिकेकडून प्रोत्साहन भत्ता देण्यात आला आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे दायित्व सातारा जिल्हा प्रशासनाकडून नगरपालिकेवर सोपवण्यात आले आहे. पालिकेने यासाठी १९ कर्मचार्यांचे पथक निर्माण केले असून प्रत्येकाला उत्तरदायित्व विभागून देण्यात आले. सहस्रो मृतदेहांवर अंत्यसंस्कार करूनही या पथकातील एकाही कर्मचार्याला कोरोनाची बाधा झालेली नाही. पालिकेच्या वतीने वेतनासह प्रोत्साहन भत्त्याची रक्कम कर्मचार्यांच्या अधिकोष खात्यांमध्ये जमा करण्यात आली आहे.