भुसावळ येथे धर्मांधांच्या वसाहतीतून पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त !

२ धर्मांध पसार !

  • स्वतःला अल्पसंख्य म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! – संपादक

  • अशा घटनांविषयी पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक

  • बर्‍याच वेळा मशिदी आणि मदरसे येथे समाजविघातक कारवाया चालतात, तसेच तेथे शस्त्रसाठाही असतो, असे पुढे आले आहे. आता या ठिकाणीही धाड टाकण्याची सूचना पोलिसांना द्याव्यात, अशी जनतेची अपेक्षा आहे ! – संपादक

भुसावळ (जिल्हा जळगाव) – शहरातील धर्मांधांच्या वसाहतीवर बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या २ पथकांनी घातलेल्या धाडीत रायफल, बंदुका, तलवारी आणि चाकू यांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आला. पोलिसांनी हा साठा जप्त करून शेख उपाख्य शिकारी अब्बास शेख आणि त्याचा मुलगा रिझवान पप्पू शेख या २ धर्मांधांवर गुन्हा नोंदवला. हे दोघे पसार झाले आहेत.

१. शहरातील संशयास्पद वाटणार्‍या लोकांच्या घरांची झडती घेण्याची अनुमती वरिष्ठ पातळीवरून मागवण्यात आली होती. त्याविषयी अनुमती मिळाल्यानंतर पोलिसांची २ पथके सिद्ध करून पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात असणार्‍या घरांवर धाडी घातल्या. (अशी अनुमती राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यांनी घेऊन प्रत्येक जिल्ह्यातील धर्मांधांच्या घरांवर धाडी घातल्या पाहिजेत, असे जनतेला वाटते ! – संपादक)

२. या कारवाईत धर्मांधांच्या वसाहती असलेल्या भागातील ईदगाहसमोर रहाणारा शेख उपाख्य शिकारी अब्बास शेख आणि त्याचा मुलगा रिझवान पप्पू शेख यांच्याकडे पुष्कळ शस्त्रसाठा असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. (धर्मांधांकडे अनेक दिवसांपासून हा शस्त्रसाठा असतांना पोलिसांना या शस्त्रसाठ्याची एवढ्या विलंबाने माहिती कशी मिळते ? गृहमंत्री आणि पालकमंत्री यांनी पोलिसांचे गुप्तचर खाते सक्षम आणि कार्यक्षम करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी जनतेची अपेक्षा आहे ! – संपादक)  

३. याची निश्‍चिती करून पथकाने धाड घातली असता शेख याच्या घराजवळच्या शेडमध्ये पुष्कळ शस्त्रसाठा मिळाला. या प्रकरणाचे पुढील अन्वेषण पोलीस हवालदार जयेंद्र पगारे करत आहेत. (हे प्रकरण संवेदनशील असल्याने या प्रकरणाचे अन्वेषण करण्याचे दायित्व वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना दिले पाहिजे, एवढी साधी गोष्ट पोलिसांना कशी कळत नाही ? – संपादक)