अशी मागणी का करावी लागते ? पूरस्थिती येऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना शासन स्वतःहून आणि पावसाळ्यापूर्वीच का करत नाही ? असे निष्क्रीय प्रशासन काय कामाचे ?
सावंतवाडी – तालुक्यातून वहाणार्या तेरेखोल नदीच्या धवडकी, माडखोल येथील पात्रातील गाळ काढण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी आमदार दीपक केसरकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, २३ जुलै या दिवशी झालेल्या अतीवृष्टीमुळे तेरेखोल नदीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती. माडखोलमधील मेटवाडी, वरकोंडवाडी, धवडकी आदी वाड्यांमधील १०० हून अधिक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये ५ फुटांपर्यंत पाणी भरले होते. घरातील सामान, धान्य, तसेच अन्य वस्तूंची मोठी हानी झाली आहे. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, तसेच माडखोल-धवडकी येथील ‘वृंदावन नर्सरी’च्या ठिकाणी प्रदीप शिरसाट यांच्या घराशेजारील ओहोळावर करण्यात आलेले अतिक्रमण काढून ओहोळाचे पाणी पुन्हा नदीत सोडावे. माडखोल धवडकी पूल ते मेटवाडीपर्यंतचा गाळ काढणे, माडखोल सातोळी पुलाच्या कामाच्या वेळी नदीपात्रात टाकलले दगड हटवणे, अत्यावश्यक ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. (अतिक्रमण आणि बांधकामाच्या वेळी नदीपात्रात दगड टाकणे यांमुळे पूरस्थिती निर्माण होऊ देणार्यांवर कारवाई व्हायला हवी ! – संपादक )