चि. रेयांशला पहिल्यांदा पाहिल्यावर ‘तो दैवी बालक असून त्याची आध्यात्मिक पातळी चांगली आहे’, असे जाणवणे आणि काही दिवसांनी तसे वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये वाचनात येणे.

चि. रेयांश रावत
कु. मधुरा भोसले

‘मे महिन्यात मला रामनाथी आश्रमात एकदा चि. रेयांश रावत हा बालसाधक दिसला. मी त्याला प्रथमच पहात होते. त्याला पाहिल्यावर मला त्याच्यात पुष्कळ सात्त्विकता आणि चैतन्य जाणवले अन् त्याला पाहून आनंद झाला. मला त्याच्या ठिकाणी एक क्षण बाल हनुमानाचे दर्शन झाले. ‘तो दैवी बालक असून त्याची आध्यात्मिक पातळी चांगली असणार’, असे विचार माझ्या मनात आले. २५.६.२०२१ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये चि. रेयांश रावत याने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे वृत्त माझ्या वाचनात आले. तेव्हा काही दिवसांपूर्वी रेयांशला प्रथम पाहिल्यावर त्याच्याविषयी जाणवलेल्या आध्यात्मिक गुणवैशिष्ट्यांमागील कार्यकारणभाव मला समजला. चि. रेयांशविषयी मला अनुभूती दिल्याविषयी मी भगवंताच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.६.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक