एस्.एस्.आर्.एफ्.च्या शिबिरात ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’, हे सत्र चालू असतांना सौ. इव्होन प्रेगेंझर यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे

सौ. इव्होन प्रेगेंझर

‘जानेवारी २०२० मध्ये सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात विदेशी साधकांसाठी साधकत्ववृद्धी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मी तेथे गेले होते. शिबिराच्या ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’, या सत्रात पू. भावना शिंदे यांनी त्यांच्याकडून झालेल्या चुका सांगितल्या आणि त्यासाठी क्षमा मागितली. त्या वेळी मला माझ्या अनाहतचक्राच्या ठिकाणी पुष्कळ चैतन्य जाणवले. मला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवत असतांना असेच वाटते. त्यानंतर मला सूक्ष्मातून दिसले, ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे विराट रूप सभागृहात आहे. ते त्यांच्या हाताने साधकांना हळुवारपणे जवळ करत आहेत. या शिबिराचे आयोजक आणि शिबिरार्थी सर्व एकच आहेत. आम्ही एकमेकांच्या जवळ आलो आहोत आणि एकमेकांमध्ये विलीन झालो. नंतर आम्ही केवळ चैतन्याच्या स्वरूपात राहिलो. ते चैतन्य एखाद्या कारंज्याप्रमाणे सर्व दिशेने लांबपर्यंत उसळत होते.’

– सौ. इव्होन प्रेगेंझर, ऑस्ट्रिया, युरोप.(८.१.२०२०)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.