फेब्रुवारी २०२१ एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट देणार्‍या जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

१. एस्.एस्.आर्.एफ्. इंग्रजी फेसबूक

अ. ‘पू. (सौ.) भावना शिंदे यांचे ‘प्रेमभाव कसा वाढवायचा ?’ या विषयावर संगणकीय प्रणालीद्वारे मार्गदर्शन होते. त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे अतिशय सुस्पष्ट, प्रेमाने आणि संयमाने दिली. या विषयावर त्यांचे ज्ञान अतिशय विलक्षण आहे. मी यातून पुष्कळ काही शिकले. ‘ते मार्गदर्शन किती उत्कृष्ट होते’, हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. माझ्यासाठी आजपर्यंतचे हे सर्वांत चांगले प्रक्षेपण होते. यासाठी मी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे आणि मुख्यत्वे पू. (सौ.) भावना शिंदे यांची आभारी आहे; कारण त्यांच्यामुळेच हे प्रक्षेपण एवढे सुंदर झाले होते.’

– कु. अनिता दासवानी, स्पेन

आ. ‘ध्यान लावणे’ या विषयावरील मार्गदर्शन ऐकून ध्यान लावतांना षटचक्रे आणि सहस्रार यांसंदर्भात चांगली अनुभूती आली. आजपर्यंत मला एवढे हलके कधीच वाटले नव्हते, तसेच मला एवढी एकाग्रता कधीच साधता आली नव्हती. मला माझ्या देहाचे अस्तित्वच जाणवत नव्हते.’ – जुली रूट वॉसमन, ग्वाटेंग

२. एस्.एस्.आर्.एफ्. लाइव्ह चॅट

अ. ‘मी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळावरील काही लेख उदा. मीठ-पाण्याचे उपाय, पूर्वजांचे त्रास आणि त्याचा व्यक्तीवर होणारा आध्यात्मिक परिणाम यांसारखे लेख वाचले आहेत. या लेखांमुळे आध्यात्मिक जगताविषयी मला अगदी सखोल माहिती मिळाली.’ – श्री. नवनीत मोझेस, क्वालालंपूर, मलेशिया.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक