कोरोनाच्या काळात अनेक लोकांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमवावा लागला !  

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जुने विधान आले समोर !

नवी देहली – केंद्रशासनाने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचे मृत्यू झाले नसल्याची माहिती संसदेमध्ये दिली असतांना शासनाचा हा दावा खोडून काढणारा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा एक जुना व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यामध्ये नितीन गडकरी म्हणत आहेत, ‘कोरोनाच्या या काळात देशातील अनेक लोकांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांचा जीव गमवावा लागला.’ गडकरी यांच्या पूर्वीच्या या विधानामुळे नेमके सत्य काय याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.