नगर – कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने पारनेर तालुका कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. तालुक्यातील २२ गावांत दळणवळण बंदी असून ७१ गावे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. असे असूनही तालुक्यात अनेक ठिकाणी गर्दीचे कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने कडक उपाययोजना करण्यास आरंभ करून चाचण्यांचे प्रमाणही वाढवले आहे.
गावामधील सरकारी कर्मचार्यांना अनुमतीविना मुख्यालय सोडून जाता येणार नाही. तसेच गावात आलेल्या पाहुण्यांना १० दिवस अलगीकरणात ठेवणार आहेत. याव्यतिरिक्त लग्न समारंभामध्ये ५० हून अधिक लोकांना प्रवेश दिला जाणार नाही. अशा प्रकारची अनेक बंधने तेथे लागू करण्यात आली आहेत.