उपविभागीय अधिकार्‍याने महामार्गाचे काम थांबवणार्‍या शेतकर्‍याच्या पोटात मारली लाथ !

  • अशा अधिकार्‍यांना बडतर्फ करून त्यांना कारागृहात टाका !
  • काँग्रेसच्या राज्यात असे उद्दाम अधिकारी कार्यरत असतील, तर त्यात चूक ते काय ? जनतेवर अत्याचार करणे हा काँग्रेसचा स्थायी भाव आहे. काँग्रेसला निवडून देणार्‍यांना हीच शिक्षा, अशी कुणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !
उपविभागीय अधिकारी भूपेंद्र यादव यांनी नरसिंगराम चौधरी या शेतकर्‍याच्या पोटात लाथ मारली

जालोर (राजस्थान) – जालोर जिल्ह्यातील सांचौर भागात उपविभागीय अधिकारी भूपेंद्र यादव यांनी नरसिंगराम चौधरी या शेतकर्‍याच्या पोटात लाथ मारली. सामाजिक माध्यमांतून या घटनेचा व्हिडीओ प्रसारित झाला आहे. यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
जालोर जिल्ह्यातील प्रतापपुरा गावात भारत माला प्रकल्पाच्या अंतर्गत बनवण्यात येणार्‍या महामार्गाच्या मोबदल्यासाठी शेतकर्‍यांनी तेथील बांधकाम थांबवले होते. या वेळी भूपेंद्र यादव यांनी चौधरी यांच्या पोटात लाथ मारली. त्यातून शेतकरी आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. पोलिसांनी केलेल्या प्रयत्नानंतर शेतकरी शांत झाले. या वेळी यादव यांनी, ‘शेतकर्‍यांनी मला मारहाण केली’, असा आरोप केला. या घटनेनंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. सांचौर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणला म्हणून शेतकर्‍यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. (शेतकर्‍याला लाथ मारणार्‍या अधिकार्‍याला सोडून आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवरच गुन्हा नोंदवणे ही मोगलाईच होय ! – संपादक)