चर्चचा संस्थापक आणि अध्यक्ष असलेल्या ख्रिस्ती धर्मप्रसारकाला अटक
|
कन्याकुमारी (तमिळनाडू) – तमिळनाडू पोलिसांनी कन्याकुमारी जिल्ह्यातील ज्योतिनगर येथील ‘ड्यूसिस ऑफ ख्राइस्ट अँग्लिकन चर्च ऑफ इंडिया’शी संबंधित ‘फेडरल चर्च ऑफ इंडिया’वर धाड घातली. येथे चर्चच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत असल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी ख्रिस्ती धर्मप्रसारक लाल एन्.एस्. शाइनसिंह याच्यासह ४ महिला आणि अन्य दोघे यांना अटक केली. ‘ऑप इंडिया’ वृत्तसंकेतस्थळाने हे वृत्त प्रकाशित केले आहे.
Tamil Nadu: Church in Kanyakumari raided for running a sex racket, pastor and 6 others arrestedhttps://t.co/MI76akHwAb
— OpIndia.com (@OpIndia_com) July 15, 2021
या चर्चमध्ये महागड्या गाड्यांमधून महिला आणि पुरुष नेहमीच येत असतात. चर्चच्या अधिकार्यांकडून चर्चचा वापर वेश्याव्यवसायासाठी होत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ही धाड घालण्यात आली. ख्रिस्ती धर्मप्रसारक लाल एन्.एस्. शाइनसिंह हाच या चर्चचा सस्थांपक आणि अध्यक्ष आहे.