जम्मू-काश्मीरमध्ये पाकच्या ड्रोनची पुन्हा घुसखोरी !

सैनिकांनी केलेल्या गोळीबारानंतर ड्रोन गेले माघारी !

पाकने आता भारतावर ड्रोनद्वारे आक्रमण करण्याची नवीन योजना आखली आहे. जोपर्यंत पाकचे अस्तित्व आहे, तोपर्यंत तो भारतावर आक्रमण करण्याच्या नवनवीन पद्धती शोधणार. त्यामुळे भारतात शांतता नांदण्यासाठी पाकला नष्ट करणेच भारताच्या हिताचे आहे !

ड्रोन (प्रातिनिधिक छायाचित्र )

जम्मू – जिहादी आतंकवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा ड्रोनद्वारे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. अर्निया येथील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ १३ जुलैच्या रात्री १० वाजता एक ड्रोन घिरट्या घालतांना दिसले. याची माहिती मिळताच सैनिकांनी ड्रोनच्या दिशेने गोळीबार केला. यानंतर ड्रोन पाकिस्तान सीमेमध्ये परतले. यापूर्वी २ जुलैला पाकिस्तानच्या ड्रोनने अर्निया सेक्टरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाही सैनिकांनी गोळीबार केल्यानंतर ते माघारी गेले होते. २७ जूनला आतंकवाद्यांनी जम्मूमधील वायूदलाच्या तळावर ड्रोनद्वारे बॉम्ब फेकले होते.
श्रीनगर, उधमपूर, राजौरी यांसहित जम्मू-काश्मीरमधील सीमाभागात ड्रोन आणि मानवरहित हवाई यंत्र यांवर बंदी घालण्यात आली आहे. अशी उपकरणे बाळगणे आणि विक्री करणे यांस मनाई आहे.