गुरूंची महती किती थोर असे ।
या पामराला ती वर्णन
करता येत नसे ।
आलो उत्तर भारतात ।
ओळख जाणण्या
स्वस्वरूपाची ।। १ ।।
भेटले मला
सद्गुरु पिंगळेकाका ।
ज्यांच्या माध्यमातून वहातसे ज्ञानगंगा श्री गुरूंची ।
दावण्या मज ओळख स्वस्वरूपाची ।
माझ्यापेक्षा अधिक तळमळ असे त्यांची ।। २ ।।
मनाच्या प्रत्येक स्थितीवर योग्य मार्गदर्शन करूनी ।
वाट ते दाखवत (दावत) असती ।
गुण-विकारांचे हे मन राहे अखंड चंचल ।
परी सद्गुरूंच्या कृपेने ते होत असे निश्चल ।। ३ ।।
गुरुबंधू-भगिनी आहेत अनेक ।
जणू गुरूंचेच एक एक ते रूप ।
प्रत्येक रूप असे सद्गुणांची खाण ।
कृपाळू गुरुमाऊली शिकवी गुरुबंधूंच्या माध्यमातून ।। ४ ।।
सद्गुरु काका शिकवती ।
काया, वाचा, मन, बुद्धी या सर्व माध्यमांतून ।
गुरूंना अपेक्षित अशी गुरुसेवा करण्याचा ।
मूर्तिमंत आदर्श ते असती ।। ५ ।।
‘ज्ञानचक्षु तुझे’, हे आहे प.पू. बाबांचे (टीप) भजन ।
त्यामधील ‘ज्ञानाचा सागर । विवेकाचा पूर’ ।
ही ओळ तंतोतंत लागू पडे सद्गुरु काकांस ।। ६ ।।
शरणागतभाव असे त्यांच्या कणाकणांत ।
नामानिराळे रहाण्याचे ते आहेत आदर्श उदाहरण ।। ७ ।।
सद्गुरु काका अध्यात्माचे विविध पैलू उलगडती ।
त्यांच्या अस्तित्वानेही मन-बुद्धीवरील
आवरण दूर होई ।। ८ ।।
असे हे सद्गुरु काका ज्यांची तळमळ असे अफाट ।
सर्व साधक मोक्षास जाण्यासाठी करती ते खटाटोप ।। ९ ।।
केवळ एकची प्रार्थना गुरुचरणांसी आता ।
करवून घ्यावेत अपेक्षित असे प्रयत्न आता ।। १० ।।
टीप : प.पू. भक्तराज महाराज
– कु. देवदत्त व्हनमारे, देहली सेवाकेंद्र (१६.३.२०२१)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |