‘नामजप करतांना झोप येते’, हे पाहिल्यावर पू. राधा पच्ची (मावशी) यांनी तीर्थ प्राशन करायला सांगणे आणि तीर्थ प्राशन केल्यावर झोप न येता प्रतिदिनपेक्षा अधिक एकाग्रतेने नामजप होणे
‘१९.४.२०२० या दिवशी सकाळी मला अल्पाहार बनवण्याची सेवा होती. त्यासाठी मी सकाळी लवकर उठले. आदल्या रात्री मला झोपायला उशीर झाला होता. त्या दिवशी अल्पाहार सेवा लवकर संपवून मी ९.३० वाजता नामजप करण्यासाठी गेले. माझी रात्री झोप झाली नसल्याने मी नामजपाला प्रारंभ केल्यावर १० मिनिटांतच मला झोप येऊ लागली. ‘मला नामजप करणे होणार नाही’, असा विचार माझ्या मनात आला आणि मी लगेच उभी राहून नामजप करू लागले. पू. राधा पच्ची यांनी मला बोलावून सांगितले, ‘‘हे तीर्थ प्राशन कर, म्हणजे तुझी झोप जाईल.’’ (पू. राधा पच्ची नामजप करतांना त्यांना पिण्यासाठी पाणी ठेवलेले असते. त्यालाच त्या ‘तीर्थ’ म्हणतात. तसा त्यांचा भाव आहे.) मी ते तीर्थ प्राशन केले आणि बसून नामजप केला.
त्यानंतर नामजप पूर्ण होईपर्यंत मला झोप आली नाही आणि प्रतिदिन करत असलेल्या नामजपापेक्षा त्या दिवशी अधिक एकाग्रतेने नामजप झाला. यातून ‘संतांचे चैतन्य कसे कार्य करते !’, हे मला लक्षात आले.
हे गुरुदेवा, ही अनुभूती दिल्याविषयी मी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. मंगला गौडा, मंगळुरू. (४.५.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |