पुणे – कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही लोकांमध्ये कोरोनाच्या नियमांविषयी गांभीर्य नाही. विशेषतः लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांकडून कोरोना संदर्भातील नियम टाळण्याची वृत्ती दिसत आहे. लसीचे दोन्ही डोस झाले तरी मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर पाळणे, ही त्रिसूत्री पाळावी लागणार आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर घेतलेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले. पुण्यात दुपारी ४ नंतर दुकाने आणि हातगाडीवाले यांनी त्यांचा व्यवसाय बंद करायला हवा. तसेच कोविड निर्बंधाची कडक कार्यवाही करण्याचे निर्देश पोलिसांना दिल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
सौजन्य : TV9 Marathi