प्रख्यात आयुर्वेदाचार्य डॉ. पी.के. वारियर यांचे निधन

आयुर्वेदाचार्य डॉ. पी.के. वारियर

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमधील प्रख्यात आयुर्वेदाचार्य आणि कोट्टक्कल आर्य वैद्यशाळेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त डॉ. पी.के. वारियर यांचे निधन झाले. एक मासापूर्वीच त्यांचा १०० वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यांच्या निधनाविषयी केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी दुःख व्यक्त केले आहे.

वारियर यांनी त्यांच्या जीवनात सहस्रो लोकांवर आयुर्वेदाद्वारे उपचार केले. यात काही देशांचे माजी राष्ट्रपती आणि माजी पंतप्रधान यांचाही समावेश आहे. वारियर यांना वर्ष १९९९ मध्ये पद्मश्री, तर वर्ष २०१० मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वारियर यांनी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातही भाग घेतला होता.