पणजी, ८ जुलै (वार्ता.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रीमंडळात ७ जुलै या दिवशी फेररचना केली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या या फेररचनेनंतर श्रीपाद नाईक यांच्याकडे पर्यटन, बंदरे, जहाजोद्योग आणि जलमार्ग खात्यांचे राज्यमंत्रीपद सोपवण्यात आले आहे. यापूर्वी श्रीपाद नाईक यांच्याकडे आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार आणि संरक्षण मंत्रालयाचे राज्यमंत्रीपद होते. श्रीपाद नाईक यांनी ८ जुलै या दिवशी नवीन खात्यांचा पदभार सांभाळला आहे.