सातारा – कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पुन्हा दळणवळण बंदी घोषित केली आहे. जिल्ह्यात केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने चालू ठेवण्याचे आदेश असल्याने अन्य व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे व्यापारीवर्गाने दळणवळण बंदी हटवण्यासाठी गावागावांत बैठका घेण्यास आरंभ केला आहे. ६ जुलै या दिवशी शहरातील व्यापार्यांनी शासनाचा निषेध करण्यासाठी हातामध्ये फलक घेत घोषणा देत आंदोलन केले. या आंदोलनामध्ये भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पत्नी आणि कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा श्रीमंत वेदांतिकाराजे भोसले याही सहभागी झाल्या होत्या.
नियमांच्या अधीन राहून व्यापार्यांना अनुमती द्या ! – श्रीमंत वेदांतिकाराजे भोसले
दळणवळण बंदीमुळे नागरिकांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांच्या आत्महत्या वाढू लागल्या आहेत. आपल्या देशात हातावर पोट असणार्यांची संख्या प्रचंड आहे. साखर कारखाना निवडणुकीत कोरोना नाही का ? व्यापार्यांवरच अन्याय का ? प्रशासनाने तातडीने दळणवळण बंदी हटवावी आणि नियमांच्या अधीन राहून व्यापार्यांना अनुमती द्यावी.