मुंबई – कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात रांचीमधून अटक केलेले ८३ वर्षीय फादर स्टॅन स्वामी यांचे ५ जुलै या दिवशी दुपारी निधन झाले. ‘स्वामी हे माओवादी आहेत, तसेच त्यांना विविध आजार असल्याचा ठोस पुरावा नाही’, असा दावा करत त्यांना जामीन संमत करण्यास राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.) विरोध केला होता.
Bhima Koregaon violence accused Stan Swamy passes away during imprisonment, informs lawyerhttps://t.co/EG5dji9AjS
— OpIndia.com (@OpIndia_com) July 5, 2021
अन्वेषण यंत्रणा आणि सरकार यांच्याकडून त्यांना रुग्णालयात भरती करण्यास विलंब झाल्याचा आरोप करून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी स्वामी यांच्या अधिवक्त्यांनी केली आहे. स्वामी यांनी जामिनासाठी याचिका प्रविष्ट केली होती.