गुरुदेवा, भाग्य माझे तुम्ही उजळविले ।

सर्व साधकांना मोक्षची वाट दाखवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

(परात्पर गुरु) डॉ. आठवले
पू. शिवाजी वटकर

गुरुदेवा (टीप १), भाग्य माझे तुम्ही उजळविले ।
मजशी भवसागरी तारिले ।। धृ.।।

पाहूनी तुमचे रूप ।
भगवंताचे स्वरूप दावियले ।
जीवन माझे आनंदाने फुलवले ।। १ ।।

पाहूनिया तुमचे चरण ।
चित्त माझे हरपले ।
गुरुपादुकांतूनी चैतन्य बरसविले ।। २ ।।

दुःख भोगण्या बळ दिले ।
घोर प्रारब्ध संपविले ।
हात धरूनी मोक्षाकडे चालविले ।। ३ ।।

जन आपत्काळाने पिडले ।
अनिष्ट शक्तींना तुम्ही हरविले ।
सुरक्षाकवचाने साधकांसी तारिले ।। ४ ।।

करुणासागर तुम्ही गुरुदेवा ।
कशीतरी केली मी साधना, सेवा ।
गोड मानूनी परि मजशी चरणी घेतले ।। ५ ।।

आता परि ना असावा दुरावा ।
हृदयातच माझ्या ठाव घ्यावा ।
हेच विनवितो शिर नमवूनी गुरुदेवा ।। ६ ।।

टीप १ – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.१.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक