परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीच्या बाहेर ठेवलेल्या मंदारच्या रोपाच्या संदर्भात केलेले संशोधन !

संतांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘परात्पर गुरु डॉ. आठवले ईश्वरी राज्याच्या स्थापनेचे महान समष्टी कार्य करत आहेत. या कार्यात अडथळे आणण्यासाठी मोठ्या वाईट शक्ती सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांवर सतत आक्रमण करतात. गत २० वर्षांपासून चालू असलेला हा ‘देवासुर लढा’ आता अंतिम टप्प्यात पोचला आहे. या सूक्ष्मातील युद्धाचे पडसाद वेळोवेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा देह, त्यांची खोली आणि खोलीतील वस्तू यांवर उमटले आहेत. यांसंदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने विपुल संशोधन करण्यात येत आहे. असेच एक वैशिष्ट्यपूर्ण संशोधन पुढे दिले आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२१ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांवर वाईट शक्तींनी सूक्ष्मातून केलेल्या आक्रमणांमुळे त्यांची प्राणशक्ती अल्प झाल्याने त्यांना पुष्कळ थकवा आला. तसेच त्यांच्या शारीरिक त्रासांत वाढ झाली. ‘परात्पर गुरु डॉक्टरांची प्राणशक्ती वाढून त्यांचे आरोग्य चांगले रहावे’, यासाठी सप्तर्षींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत किंवा खोलीच्या बाहेर मंदारचे (पांढर्‍या रूईचे) रोप ठेवण्यास सांगितले. त्यानुसार २६.३.२०२१ या दिवशी एका कुंडीत मंदारचे रोप लावून ते परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीच्या बाहेर ठेवण्यात आले. १६.४.२०२१ या दिवशी मंदारचे रोप लावलेल्या कुंडीत एका पक्ष्याचे नवजात पिल्लू पडल्याचे आढळून आले. या घटनेचा मंदारच्या रोपावर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी त्या रोपाची ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. या निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

१. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्लेषण :

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीच्या बाहेर ठेवलेल्या मंदारच्या रोपामध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळणे आणि ते रोप होमाच्या ठिकाणी ठेवल्यानंतर रोपातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे.

टीप – पक्ष्याचे पिल्लू कुंडीत असतांना मंदारच्या रोपाचे केलेले निरीक्षण

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

सौ. मधुरा कर्वे

२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीच्या बाहेर ठेवलेल्या मंदारच्या रोपामध्ये आरंभी पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असणे : श्री गणपति प्राणशक्तीची देवता आहे. मंदार वृक्षामध्ये श्री गणपतीचे तत्त्व आकृष्ट करून ते प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे. सप्तर्षींच्या संकल्पामुळे परात्पर गुरु डॉक्टरांना मंदारच्या रोपाच्या माध्यमातून प्राणशक्ती मिळत होती.

२ आ. मंदार रोपाच्या कुंडीमध्ये पक्ष्याचे पिल्लू पडल्यानंतर रोपामध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळणे : मंदार रोपाच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरांची प्राणशक्ती वाढून त्यांचे आरोग्य सुधारण्यास साहाय्य होणार होते. असे होऊ नये, म्हणून वाईट शक्तींनी पक्ष्याच्या पिल्लाला माध्यम बनवून त्याला नकारात्मक शक्तीने भारित केले. हे पिल्लू मंदार रोपाच्या कुंडीत पडल्याने रोपावर नकारात्मक स्पंदनांचे आवरण आले. यामुळे मंदार रोपाच्या कार्यात अडथळा निर्माण झाला. (१६.४.२०२१ या दिवशी मंदार रोपाच्या कुंडीत पडलेल्या पक्ष्याच्या पिल्लाची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. तेव्हा त्या पिल्लामध्ये सकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ प्रमाणात ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जा आढळून आल्या आणि त्यांच्या प्रभावळी अनुक्रमे १२.३५ मीटर अन् ६.८३ मीटर होत्या.)

२ इ. मंदारच्या रोपाला होमाच्या ठिकाणी ठेवल्याने रोपावर आलेले नकारात्मक स्पंदनांचे आवरण दूर होऊन त्याचे कार्य सुरळीतपणे चालू रहाणे : मंदार रोपावर आलेले नकारात्मक स्पंदनांचे आवरण दूर व्हावे, यासाठी ते रोप रामनाथी आश्रमात चालू असलेल्या श्री ललिता त्रिपुरसुंदरीदेवीच्या होमाच्या ठिकाणी ठेवण्यात आले. या होमातील चैतन्यामुळे रोपावरील नकारात्मक स्पंदनांचे आवरण नाहीसे होऊन त्याचे कार्य सुरळीतपणे चालू राहिले.

थोडक्यात, ‘हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य पूर्ण होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले जिवंत रहाणे अत्यंत आवश्यक आहे’, असे अध्यात्मातील जाणकारांनी (संतांनी) सांगितले आहे. मोठ्या वाईट शक्ती विविध क्लृप्त्या लढवून परात्पर गुरु डॉक्टरांना येनकेन प्रकारेण त्रास देऊन हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात अडथळे आणण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्नशील असतात, ते या संशोधनातून लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१७.६.२०२१)

ई-मेल : [email protected]

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.