भारताच्या ‘अग्नी प्राईम’ क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी

भारताचे शास्त्रज्ञ भारतीय सैन्याला अत्याधुनिक क्षेपणास्त्र बनवून देत आहेत; मात्र जिहादी आतंकवादी आणि पाकिस्तान केवळ लहान ड्रोनच्याच साहाय्याने भारतावर आक्रमण करण्यात यशस्वी ठरत आहेत. हे पहाता भारताने आता अशा क्षेपणास्त्रांचा प्रत्यक्षात वापर करावा, असे जनतेला वाटते !

‘अग्नी प्राईम’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

चंडीपूर (ओडिशा) – भारताने २ सहस्र किलोमीटरपर्यंत मारा करणार्‍या ‘अग्नी प्राईम’ या क्षेपणास्त्राची २८ जून या दिवशी येथे यशस्वी चाचणी घेतली. अन्य क्षेपणास्त्रांपेक्षा हे क्षेपणास्त्र लहान आणि हलके आहे.