हिंदु धर्माधिष्ठित जीवनप्रणाली स्वीकारलेले राष्ट्र हवे ! – स्वामी विवेकानंद
हे राष्ट्र जिवंत रहावे, अशी आपली धडपड असेल, तर हे राष्ट्र पूर्णपणे हिंदु धर्माधिष्ठित जीवनप्रणाली स्वीकारलेले राष्ट्र असले पाहिजे ! आमच्यासाठी धर्म आणि राष्ट्र वेगळे नाहीत. आमचे धर्मपुरुष हे सारे राष्ट्रपुरुष आहेत आणि राष्ट्रपुरुषही धर्म पाळणारे आहेत. देवाचे पाय धुतांनासुद्धा ‘या राष्ट्राला बळ प्राप्त होवो’, असा मंत्र आम्ही म्हणतो. धर्माचे सारे मंत्र राष्ट्रकल्याणाचेच, नव्हे तर विश्वकल्याणाचे आहेत. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेमुळे राष्ट्रकल्याण आणि विश्वकल्याण होणारच आहे.