ऑस्ट्रेलियामधील ‘फॅमिली फर्स्ट’ (कुटुंब प्रथम) नावाचा राजकीय पक्ष स्थापन करण्यात आला आहे. कुटुंबव्यवस्था वाचवण्यासाठी तो प्रयत्न करत आहे. सध्या पाश्चात्त्य राष्ट्रांसमोरील सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे कुटुंब वाचवणे; कारण ते वाचवले नाही, तर समाजही विलंबाने का होईना उद्ध्वस्त होईल.
डेव्हिड सेल्बर्न हे पाश्चिमात्य जगातील प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांनी ‘द लॉजिंग बॅटल विथ इस्लाम’, हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी लिहिले आहे, ‘इस्लाम पाश्चिमात्य जगाला हरवत आहे. इस्लामची भक्कम कुटुंबव्यवस्था ही लढाई चालू ठेवण्यास सक्षम आहे.’ त्यात पराभवाची अनेक कारणे सांगितली आहेत. त्यातील एक कारण इस्लामची भक्कम कुटुंबव्यवस्था हे एक आहे. यामुळेच डेव्हिड सेल्बर्न आणि बिल वॉर्नर यांसारख्या लेखकांना हे सांगणे भाग पडले आहे की, इस्लामच्या भक्कम कुटुंबपद्धतीमुळे विलंबाने का होईना, इस्लामी देश पाश्चिमात्य देशांना हरवतील. ‘पुढच्या काही दशकांत संपूर्ण युरोप इस्लाममय होईल’, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पाश्चिमात्य जगात कुटुंबव्यवस्था नष्ट झाल्याने लोकांना लग्न करायला आवडत नाही. समलैंगिकता, अनैतिक संबंध, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ (विवाह न करता एकत्र रहाणे) यांसारख्या दुष्प्रवृत्तींमुळे कुटुंबव्यवस्था मोडकळीस येत आहे.
ज्यांना आपले वडील कोण ?, हेच ठाऊक नाही, अशा पद्धतीने जन्माला येणार्या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमभाव, आपुलकी, जिव्हाळा उरलेला नाही. त्यागाची भावनाच संपुष्टात आली आहे. प्रत्येक जण एकलकोंडा होऊन मानसिक तणावाखाली वावरत आहे. मानसिक आधाराच्या अभावी मनात भीतीने घर केले आहे. नकारात्मकतेत वाढ होत आहे. केवळ क्षणिक आणि शारीरिक संबंधांपुरते जीवन अन् कुटुंब मर्यादित झाले आहे.
हे झाले युरोपचे ! भारतातही कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. रक्ताची नाती संपण्याच्या मार्गावर आहेत आणि काही वेळा ती संपवलीही जात आहेत (विविध कारणांवरून एकमेकांची हत्या केली जाते.) यासंदर्भात सामाजिक स्तरावर चर्चा, विचारविनिमय होणे आवश्यक आहे. आपली सभ्यता, संस्कृती आणि पिढ्या वाचवणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक भारतियाने याकडे गांभीर्याने पहायला हवे.
– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.