चेन्नई येथील ‘जनकल्याण’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे नेते नागराजन् यांचे निधन

हिंदु जनजागृती समितीशी होते आपुलकीचे संबंध !

कै. नागराजन्

चेन्नई (तमिळनाडू) – येथील हिंदु धर्माभिमानी आणि राष्ट्राभिमानी, तसेच ‘जनकल्याण’ या संघटनेचे चेन्नई जिल्हाप्रमुख नागराजन् यांचे १३ जून या दिवशी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. नागराजन् बराच काळ कांची कामकोटी पीठाशी संबंधित होते. त्यांनी कांची कामकोटी पीठाच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले होते.

नागराजन् यांचे हिंदु जनजागृती समितीशी जवळचे संबंध होते. त्यांना समितीचे कार्यकर्ते आणि कार्य यांविषयी पुष्कळ आपुलकी होती. ते तमिळ भाषेतील ‘सनातन पंचांगा’चा प्रसार करत. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमधील अनेक लेख त्यांच्या ‘जनकल्याण’ नियतकालिकात नियमिपणे प्रकाशित होत असत. समितीच्या हिंदू अधिवेशनासाठी कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांचा आशीर्वचनरूपी संदेश मिळवण्यास नागराजन् यांनी बरेच साहाय्य केले होते.