जम्मू-काश्मीरमध्ये श्री व्यंकटेश्‍वराच्या मंदिराचा रविवारी भूमीपूजन सोहळा !

  • तिरुमला तिरुपती देवस्थानला ६२ एकर भूमी प्रदान !

  • १७ एकर भूमीत होणार मंदिर, वैदिक पाठशाळा, यात्रेकरूंसाठी सुविधा, कर्मचारी संकुल !

  • कलम ३७० रहित झाल्यानंतर पहिल्या मंदिराची उभारणी !

जम्मू-काश्मीरमधील जिहादी आतंकवाद्यांकडून हिंदू आणि हिंदूंची श्रद्धास्थाने यांना असलेला धोका आजही कायम आहे, हे तेथे घडणार्‍या घटनांवरून पुनःपुन्हा सिद्ध होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता या मंदिराला संरक्षण देण्यावर व्यय करण्यापेक्षा जम्मू-काश्मीरमधील जिहादी आतंकवाद चिरडून टाकून हिंदू आणि त्यांच्या श्रद्धास्थानांसाठी कायमस्वरूपी निर्भय अन् सुरक्षित वातावरण निर्माण केले पाहिजे !
भगवान श्री व्यंकटेश्‍वर

श्रीनगर – आंध्रप्रदेमधील तिरुमला तिरुपती देवस्थानच्या वतीने जम्मू-काश्मीर येथे बांधण्यात येणार्‍या भगवान श्री व्यंकटेश्‍वराच्या मंदिराचा भूमीपूजन सोहळा १३ जून २०२१ या दिवशी राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी तिरुमला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बारेड्डी यांच्यासह अन्य पदाधिकारीही उपस्थित रहाणार आहेत. ‘न्यूज ऑन एआयआर्’ या वृत्तसंकेतस्थळाने याविषयीचे वृत्त प्रसारित केले आहे, तसेच टि्वटरही अनेकांनी ट्वीट करून याविषयीची माहिती दिली आहे.

या वृत्तानुसार, केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर तिरुमला तिरुपती देवस्थाने तेथे भगवान श्री व्यंकटेश्‍वराचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी राज्यपाल सिन्हा यांनी एप्रिल २०२१ मध्ये देवस्थानला ६२ एकर भूमी उपलब्ध करून दिली. या ६२ एकरपैकी पहिल्या टप्प्यात १७ एकर भूमीवर बांधकाम करण्यात येणार आहे. यामध्ये मंदिर, वैदिक पाठशाळा, कर्मचारी संकुल, यात्रेकरूंसाठी सुविधा आदींचा समावेश आहे. यासाठी ३३ कोटी रुपये व्यय अपेक्षित आहे.