‘औषधी’ नावाचे आयुर्वेदाचे आस्थापन हे केरळ सरकारच्या मालकीचे असल्याचे उघड !

एकीकडे केरळमधील साम्यवादी पक्षाकडून गोहत्या बंदीचा विरोध केला जातो आणि गोमांसाची मेजवानी आयोजित केली जाते. दुसरीकडे त्याच पक्षाच्या सरकारकडून सरकारी स्तरावरून शेण, गोमूत्र उत्पादने बनवणारे आस्थापन चालवून पैसे कमावले जातात ! असे असेल, तर सरकार राज्यात गोहत्या बंदी का करत नाही ?

(प्रतिकात्मक छायाचित्र)

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ सरकारच्या मालकीचे आयुर्वेद औषध उत्पादन आस्थापन ‘औषधी’ हे गायीचे शेण, मूत्र, दूध, तूप आणि दही यांपासून बनवलेले ‘पंचगव्य घृतम्’ विक्री करतांना दिसत आहे. ‘औषधी’ आस्थापन म्हणते की, त्यांचे हे औषध मानसिक रोग, कावीळ, ताप, अपस्मार, स्मरणशक्ती, तसेच एकाग्रता यांत सुधारणा करते.

१. ‘औषधी’ आस्थापन स्वतःची ओळख भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील ‘आयुर्वेद औषधांचे सर्वांत मोठे उत्पादक’ म्हणून करते. केरळ सरकारला सातत्याने नफा मिळवून आणि लाभांश देणार्‍या सार्वजनिक क्षेत्रातील काही आस्थापनांपैकी हे एक आस्थापन आहे.

२. या आस्थापनाची माहिती संकेतस्थळावरून, तसेच सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित केली जात आहे. यामुळे लोक साम्यवाद्यांना विचारत आहेत की, ते गायीचा अवमान आतातरी थांबवतील का ?