अश्लीलता पसरवणार्‍या माध्यमांचे तरुणाईवरील गंभीर दुष्परिणाम !

एकंदर समाजाची नैतिकता खालावली आहे. साहजिकच तरुणांमध्येही नैतिकतेचा अभाव प्रकर्षाने लक्षात येतो. विज्ञापने, चित्रपट, दूरचित्रवाहिन्या, प्रसारमाध्यमे, ‘ओटीपी प्लॅटफॉर्म’ आणि यावर कहर म्हणून ‘पॉर्न फिल्म’ यांच्या माध्यमातून सध्या अश्लीलता प्रचंड प्रमाणात बोकाळली आहे. भारतातील तरुण पिढी याला मोठ्या प्रमाणात बळी पडली आहे. पाश्चात्त्य देश आज शारीरिक संबंधातील स्वातंत्र्याचे दुष्परिणाम भोगत असतांना भारतातील तरुण पिढी मात्र अनिर्बंध जीवन जगण्याकडे आकर्षिली गेली आहे. चित्रपटांमुळे ‘प्रेमप्रकरण असणे अथवा ‘गर्लफ्रेंड’ किंवा ‘बॉयफ्रेंड’ असणे, ही एक अपरिहार्य गोष्ट आहे’, अशी मानसिकता गेल्या काही दशकांपासूनच भारतात झाली आहे. याचाच पुढचा टप्पा ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाण्यामध्ये झाला आहे.

वरील सर्व सूत्रांचे गंभीर परिणाम दर्शवणारी समाजातील काही उदाहारणे पाहू.


नागपूर येथे १९ वर्षांखालील दीड सहस्र तरुणींचा गर्भपात

पाश्चात्त्यांचे अंधानुकरण आणि धर्मशिक्षणाचा अभाव यांमुळे वाया जात असलेली देशाची तरुण पिढी !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

‘नागपूर जिल्ह्यात मागील वर्षी १९ वर्षांखालील १ सहस्र ५९६ तरुणींनी गर्भपात केला असून यात १११ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. ही माहिती ‘मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नंसी’च्या (एम्.टी.पी.) केंद्रातून आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाली. १५ वर्षांखालील १११, तर १५ ते १९ वयोगटातील १ सहस्र ४८५ तरुणींनी गर्भपात केला. शहरातील २१८ एम्टीपी केंद्रावरून आलेली ही अधिकृत आकडेवारी आहे. त्यामुळे अनधिकृत केंद्रांवरील संख्या यापेक्षा वीसपट अधिक असण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली. बलात्कारामुळे १५९ महिला गर्भवती झाल्या असून त्यांनाही समाजात अपकीर्तीच्या भीतीने गर्भपात करावा लागल्याचीही धक्कादायक गोष्ट यातून स्पष्ट झाली आहे. सामाजिक नैतिकता ढासळत असल्याचे हे द्योतक आहे. ’

शहरांमध्ये गर्भपात करण्यात २० वर्षांखालील तरुणींचे प्रमाण सर्वाधिक !

‘शहरी भागात तरुणांसाठी शरीरसंबंध ठेवणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. अल्प वयातच तरुण-तरुणी यांच्यातील शारीरिक आकर्षण वाढत असून गर्भपात करण्यामागे २० वर्षांखालील तरुणींची संख्या सर्वाधिक असल्याचे वास्तव सरकारच्या आरोग्य विभागाने केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. ‘एन्एस्एस्ओ’ या सर्वेक्षण संस्थेच्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागात गर्भवती रहाणार्‍या स्त्रियांचे प्रमाण ७७ टक्के असून गर्भपाताचे प्रमाण २ टक्के आहे.

मुंबईतील विद्यार्थी आठवड्याला बलात्काराचे ४० व्हिडिओ पहातात !

  • सनी लिओनसारख्या ‘पोर्न स्टार’ला महत्त्व दिल्यावर आणखी काय होणार ?
  • ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापनेला पर्याय नाही !
प्रतिकात्मक छायाचित्र

‘रेस्क्यू रिसर्च अँड ट्रेनिंग चॅरिटेबल ट्रस्ट’कडून ‘पॉर्न’ (शारीरिक संबंधाचे अश्लील व्हिडिओ) बघण्याची सवय आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर होणारा परिणाम’ याविषयी अभ्यास करण्यासाठी मुंबईतील ५०० विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले. यामध्ये मुंबईतील विद्यार्थी आठवड्याला पॉर्न संकेतस्थळावरील बलात्काराचे ४० व्हिडिओ पहात असल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आला आहे. बलात्काराचे हिंसक व्हिडिओ पहातांना ६३ टक्के विद्यार्थी स्वत:ला तेथे अनुभवतात. ३३ टक्के मुले आणि २४ टक्के मुली अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर स्वत:ची अश्लील छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर ‘शेअर’ करतात. हे अश्लील व्हिडिओ पाहिल्यावर ३५ टक्के विद्यार्थी शरीरसंबंध ठेवण्यास प्रारंभ करत असल्याचा धक्कादायक प्रकारही या सर्वेक्षणात आढळून आला आहे.’


इन्स्टाग्रामवरून शाळकरी मुलांकडून सामूहिक बलात्काराचा कट !

‘नवी देहली येथे ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमांवर ‘चॅट’वर काही शाळकरी मुले सामूहिक बलात्काराचा कट रचत असल्याचे समोर आले आहे. या मुलांनी ‘इन्स्टाग्राम ग्रुप’मध्ये ‘बॉईज लॉकर रूम’ नावाचा ‘ग्रुप’ बनवला होता. हे ‘चॅट’ ट्विटरवर शेअर करण्यात आल्यावर हा कट उघडकीस आला. या ‘ग्रुप’मधील बहुतेक मुले दक्षिण देहलीत रहाणारी आहेत. या प्रकरणी अद्याप पोलिसांनी कुणावरही गुन्हा नोंदवलेला नाही. या घटनेचे अन्वेषण चालू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.’


विद्यार्थ्यांकडून शिक्षिकेच्या संदर्भात अश्लील वर्तन होणे, इतकी अधोगतीला गेलेली कुसंस्कारी विद्यार्थ्यांची मानसिकता !

विद्यार्थ्याकडून शिक्षिकेस प्रसाधनगृहात डांबून शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी : ‘नवी देहली येथील शाहदरा जिल्ह्यातील विवेक भागात असणार्‍या सरकारी शाळेतील ४४ वर्षीय शिक्षिकेला प्रसाधनगृहात डांबून तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी करण्याचा एका विद्यार्थ्याकडून प्रयत्न झाला. शिक्षिका प्रसाधनगृहात गेल्यावर या विद्यार्थ्याने बाहेरून कडी लावून तिच्याकडे वरील मागणी केली. शिक्षिकेने आरडाओरड केल्यावर विद्यार्थी तेथून पळून गेला. पोलिसांनी अज्ञात विद्यार्थ्याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे.’

बलात्कार करणार्‍या नराधमांना फासावर लटकवा !

अपहरण करून, गुंगीची औषधे किंवा मद्य पाजून, अपहरण करून, आमिषे दाखवून आदी विविध कारणांतून युवतींवर बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार होतात. त्यात काही मासांच्या बालिकांपासून अती वृद्ध स्त्रियांवरही तरुण वासनांधांनी बलात्कार केल्याच्या अतीविकृत घटना घडतात. परस्त्रीकडे मातेसमान पहाण्याची शिकवण देणार्‍या भारतीय संस्कृतीत बलात्काराची कीड पसरली आहे. छत्रपती शिवरायांच्या राज्यात बलात्कार करणार्‍यांचे हात-पाय तोडले जात. त्यामुळे स्त्रिया सुरक्षित होत्या.

देशाच्या भावी पिढीचे अविभाज्य अंग असणार्‍या युवती आणि वासनांधतेच्या चिखलात लोळणारे युवक असणारी पिढी देशाचे भविष्य कसे घडवणार ?