सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी पूर्वग्रह या स्वभावदोषावर मात करण्यासाठी व्यष्टी आढाव्यात सांगितलेले सूत्र !

सद्गुरु राजेंद्र शिंदे

१. मोठा दगड बांधून कुणालाही नदीत फेकल्यास तो बुडेल, त्याचप्रमाणे आपण पूर्वग्रह या स्वभावदोषाच्या दगडाला चिकटून बसलो, तर आपली प्रगती होणार नाही

सौ. अंजली जोशी

‘सद्गुरु राजेंद्रदादा यांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात पूर्वग्रह या स्वभावदोषावर मात करण्यासाठी सांगितलेले एक उदाहरण एका साधिकेने मला सांगितले. ते म्हणाले, ‘‘आपल्या शरिराला एक मोठा दगड बांधला आणि आपल्याला नदीत फेकले, तर त्या दगडाच्या समवेत आपणही नदीत बुडू. त्याचप्रमाणे आपण पूर्वग्रह या स्वभावदोषाच्या दगडाला चिकटून बसलो, तर आपली प्रगती होणार नाही. आपण या दगडाप्रमाणे अधोगतीला जाऊ, हे लक्षात ठेवायला हवे.’’

२. सद्गुरु राजेंद्रदादा यांनी सांगितलेले सूत्र ऐकल्यापासून पूर्वग्रह या स्वभावदोषावर मात करण्यास सोपे जाणे

हे ऐकल्यावर मला माझ्या स्थितीची जाणीव झाली आणि माझ्या लक्षात आले की, माझ्या मनात ज्यांच्याविषयी पूर्वग्रह आहेत, त्यांचे मला सतत स्वभावदोषच दिसत रहातील आणि त्यांच्यात गुरुरूप बघणे मला कठीण होईल.  माझ्यातील पूर्वग्रह या स्वभावदोषावर मात करण्यासाठी हे उदाहरण सतत माझ्या डोळ्यांसमोर येते आणि मला पूर्वग्रह या स्वभावदोषावर मात करायला सोपे जाते. त्यासाठी श्रीगुरुचरणी शरणागत.’

– सौ. अंजली जोशी, सनातन आश्रम, मिरज. (१९.४.२०२१)